West Indies Vs India 1st Test Day 2  esakal
क्रीडा

West Indies Vs India 1st Test : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 162 धावांची आघाडी, यशस्वी दीडशतकाच्या जवळ

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 1st Test Day 2 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस यशस्वी जैसवालनं गाजवला. त्याने दुसऱ्या दिवशीचे तीनही सत्र फलंदाजी करत 350 नाबाद 143 धावा केल्या. रोहित शर्माने देखील शतकी (103) खेळी केली. या दोघांनी दिलेल्या 229 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 312 धावा केल्या. भारताकडे आता 162 धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यशस्वी जैसवाल धावांवर 143 तर विराट कोहली 36 धावांवर खेळत होते.

यशस्वीची विराटसोबत अर्धशतकी भागीदारी 

गिल बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि यशस्वी जैसवालने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 300 च्या पार पोहचवले.

IND 245/2 (81) : चहापानासाठी खेळ थांबला 

भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट्स गमावून 99 धावा केल्या. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 2 बाद 245 धावा झाल्या होत्या. भारताकडे 95 धावांची आघाडी होती.

IND 229/1 (75.4) : यशस्वीचे दमदार शतक 

यशस्वी जैसवालने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करत मोठा धमाका केला. तो शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यानंतर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा तिसरा सलामीवीर ठरला आहे.

यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी 229 धावांची सलामी देत वेस्ट इंडीजविरूद्धची सर्वात मोठी सलामी भागीदारी रचली. रोहित शर्माने देखील आपले 10 वे कसोटी शतक 221 चेंडूत पूर्ण केले. मात्र शतकानंतर तो लगेचच बाद झाला.

रोहित - यशस्वीची दमदार भागीदारी 

रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र आरामात खेळून काढले. या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघासाठी नाबाद 150 धावांची भागीदारी रचली.

रोहित शर्माचे अर्धशतक 

यशस्वी जैसावाल पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले.

यशस्वी जैसवालचे अर्धशक

यशस्वी जैसवालने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्माच्या साथीने नाबाद शतकी सलामी देखील दिली.

सलामी जोडी मोठा धमाका करणार? 

भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल हे दुसऱ्या दिवशी बिनबाद 80 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करणार आहेत. या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT