Brijbhushan Singh Esakal
क्रीडा

WFI Chief vs Wrestlers : वाद आणखी पेटणार! आरोप करणाऱ्यांविरोधात बृजभूषण सिंग यांची याचिका

खेळाडूंच्या आरोपांनंतर क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

WFI Chief vs Wrestlers : शोषणाचा आरोप केल्यानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या अत्याचाराविरोधात देशभरातील अनेक स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. दरम्यान, आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सिंग यांनी विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंची नावे आरोपी म्हणून नमुद केली आहेत. त्यामुळे आता हा वाद अधिक पेटणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवल्याचे सिंग यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात यावा अशी मागणी बृजभूषण यांनी केली आहे.

दरम्यान, खेळाडूंच्या आरोपांनंतर क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय सिंग यांना चार आठवडे कुस्ती संघटनेपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT