भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. (WFI president Brij Bhushan Singh No corroborative evidence found to indicate commission of POCSO charges Delhi Police)
दिल्ली पोलिसांनी आपल्या 550 पानांच्या अहवालात POCSO तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले आहे.(Latest Marathi News)
पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे. एवढेच नाही तर पॉक्सो प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रारदार म्हणजेच पीडितेचे वडील आणि पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.(Latest Marathi News)
21 एप्रिल रोजी 7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी ब्रिजभूषण विरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. पहिली केस 6 प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून होती. तर अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पॉक्सो कायद्यांतर्गत 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Marathi News)
अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा UTurn
लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या 7 महिला कुस्तीपटूंपैकी एकमेव अल्पवयीन मुलीने न्यायदंडाधिकार्यांसमोर नोंदवलेल्या तिच्या आधीच्या जबाबात बदल केला. (Latest Marathi News)
आता त्यांनी नवीन जबाब नोंदवला आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी न्यायालयात जाऊन आपले म्हणणे बदलण्याचा मुद्दा मान्य केला आहे.(Latest Marathi News)
वडील म्हणाले, 'जेव्हा पैलवानांनी आंदोलन सुरू केले आणि सांगितले की ब्रिजभूषण कुस्तीपटूंचा विनयभंग आणि गैरवर्तन करतो, तेव्हा मलाही वाटले की माझ्या मुलीशी भेदभाव केला जात आहे. कुस्ती महासंघाने भेदभाव केला होता, त्यामुळे रागाच्या भरात आम्ही 2-3 गोष्टी जोडल्या होत्या... आता मी कोणत्याही भीतीने किंवा दबावाखाली विधान बदललेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.