IND vs SL 1st ODI Colombo Weather Report sakal
क्रीडा

IND vs SL 1st ODI Weather Report: पहिल्या सामन्यावर काळे ढग! मॅच होणार रद्द? जाणून घ्या पावसाची टक्केवारी

Sri Lanka vs India 1st ODI Weather Forecast : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दुपारी खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

IND vs SL 1st ODI Colombo Weather Report: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दुपारी खेळला जाणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली पहिल्यांदाच खेळणार आहेत.

या दोघांनीही टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. टीम इंडिया वर्ल्ड कपनंतर पहिल्या वनडे मालिकेत उतरणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा सामना वाहून जाण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. आता टीम इंडिया तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे आणि उपकर्णधार शुभमन गिल असेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका असेल. मात्र, पहिल्या सामन्यात कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही.

Accuweather नुसार, दुपारी 3:00 वाजेपर्यंत पाऊस पडणार नाही, परंतु दुपारी 4:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या कालावधीत पावसाची पातळी 50 टक्क्यांहून अधिक असेल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे. शुक्रवारी कोलंबोमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता आहे. वादळी वाऱ्याची शक्यता आहे. आर्द्रता पातळी 80 ते 85 टक्के राहील आणि तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

श्रीलंका – चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेलागाले, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Thane News: डोंबिवली सर्पदंश प्रकरण; डॉ. संजय जाधव निलंबित, पालिका आयुक्तांकडून मोठी कारवाई

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Kannad Accident : तेलवाडीजवळ दुचाकीला पिकअपचा अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मंचर येथून परांडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा साहित्याचे दोन ट्रक रवाना

SCROLL FOR NEXT