Chess World Cup Final R Praggnanandhaa  Esakal
क्रीडा

Chess World Cup Final : प्रग्नानंद आहे सुवर्णसंधी! कसा खेळला जातो बुद्धीबळाचा टाय ब्रेकर?

अनिरुद्ध संकपाळ

Chess World Cup Final : बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारताच्या अवघ्या 18 वर्षाच्या प्रग्नानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला तगडे आव्हान दिले आहे. या दोघांमधील पहिले दोन गेम हे ड्रॉ झाले आहेत.

पहिल्या गेममध्ये प्रग्नानंद आणि कार्लसन यांनी 35 चालीनंतर गेम ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्याद्यांचा रंग बदलला. काळी प्यादी घेऊन खेळणाऱ्या प्रग्नानंदने सुरूवात चांगली केली होती. मात्र कार्लसलनने हा गेम ड्रॉ करण्याच्या दृष्टीनेत खेळला. अखेर 30 चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी ड्रॉसाठी हस्तांदोलन केले.

आता बुद्धीबळाचा नवा विश्वविजेता ठरवण्यासाठी आज टाय ब्रेकर खेळवला जाणार आहे. अझबैजान येथील बाकूमध्ये सुरू असलेला हा बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना टाय ब्रेकरवर होणार आहे. या सामन्यात वेळेला खूप महत्व असते. कार्लसनला माहिती आहे की प्रग्नानंद हा टाय ब्रेकरमध्ये चांगला खेळतो.

याबाबत कार्लसन म्हणाला की, 'प्रग्नानंदने अनेक चांगल्या खेळाडूंविरूद्ध टाय ब्रेकर सामने खेळले आहेत. मला माहिती आहे की तो यात खूप चांगला आहे. जर माझा उत्साहीपणा टिकून राहिला, माझ्यासाठी दिवस चांगला ठरला तर नक्कीच मला चांगली संधी आहे.'

बुद्धीबळाचा टाय ब्रेकर सामना असतो कसा?

- बुद्धीबळाच्या टाय ब्रेकर सामन्यात दोन खेळाडू हे दोन गेम खेळतात. हे दोन्ही गेम रॅपिड प्रकारात मोडतात. यात प्रत्येक खेळाडूला 25 मिनिटे मिळतात. तसेच प्रत्येक चालीनंतर 10 सेकंद वेळ वाढवून दिली जाते.

- जर या फेरीत देखील निकाल लागला नाही तर अजून दोन रॅपिड गेम होतात. त्यात प्रत्येक खेळाडूला 10 मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर 10 अतिरिक्त सेकंद मिळतात.

- या रॅपिड गेमनंतरही विजेता ठरा नाही तर त्यानंतर अजून दोन रॅपिड गेम खेळले जातात. त्यात प्रत्येक खेळाडूला 5 मिनिटे आणि प्रत्येक चालीला 3 सेकंद मिळतात.

- मात्र तरी सुद्धा जर विजेता मिळाला नाही तर विजेता हा सडन डेथवर ठरवला जातो. हा सामना 3 मिनिटे 2 सेकंद या फॉरमॅटमध्ये खेळवला जातो.

भारताच्या 18 वर्षाच्या प्रग्नानंदने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबिनो कारुआनाचा सेमी फायनलमध्ये टाय ब्रेकर राऊंडमध्येच पराभव केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT