The Ashes Series 2023 sakal
क्रीडा

The Ashes Series 2023: ॲशेस मालिकेचा थरार आजपासून; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Kiran Mahanavar

Ashes Series 2023 ENG Vs AUS 1st Test : भारतीय संघाला हरवून कसोटी अजिंक्यपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी हा लौकिक टिकवण्यासाठी इंग्लंडचे मोठे आव्हान पार करावे लागणार आहे. या दोन संघातील प्रतिष्ठेची ॲशेस मालिका आजपासून सुरू होत आहे.

गेल्या दोन कसोटी अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यास इंग्लंडचा संघ अपयशी ठरला होता. त्यातील एका वर्षात गोलंदाजीची सरासरी न राखल्यामुळे झालेला दंड, परिणामी गुणांमध्ये झालेली कपात त्यांच्या मुळावर आली होती.

आता आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापासून नव्या कसोटी अजिंक्यपद मालिकेस सुरुवात होत असल्यामुळे इंग्लंडचा संघ नव्या उमेदीने मैदानात उतरेल. काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातून इंग्लंडचे संघ व्यवस्थापन ॲशेस मालिकेची तयार करत होते.

भारतीय संघ गोलंदाजीत कमजोर ठरला होता; परंतु इंग्लंडकडे विख्यात जेम्स अँडरसन, त्याच्या साथीला स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन असे वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. सोबत फिरकी गोलंदाजीत मोईन अली असेल.

ॲशेस मालिका सुरू होण्यापूर्वी संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या -

  • पहिली कसोटी 16 ते 20 जून दरम्यान एजबॅस्टन येथे खेळवली जाणार आहे.

  • दुसरा कसोटी सामना 28 जून ते 2 जुलै दरम्यान लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाईल.

  • तिसरी कसोटी 6 जुलै ते 10 जुलै दरम्यान हेडिंग्ले येथे होणार आहे.

  • चौथा कसोटी सामना 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवला जाणार आहे.

  • पाचवी आणि शेवटची कसोटी 27 ते 31जुलै दरम्यान ओव्हल येथे होणार आहे.

भारतात सामना कधी आणि कसा बघायचा

16 जूनपासून ॲशेस मालिका सुरू होत आहे. पहिला सामना एजबॅस्टन येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तुम्‍हाला भारतात त्‍याचे लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग पहायचे असेल, तर सोनी लाइव्‍ह ॲपवर तुम्‍ही ॲशेसचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT