IPL 2023 Free On Jio Cinema
IPL 2023 Free On Jio Cinema  esakal
क्रीडा

IPL 2023 : Jio Cinema वर फुकटात IPL पाहण्यासाठी Jio चं सीमकार्ड घ्यायला लागतंय काय?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Free On Jio Cinema : जगातील सर्वात मोठी क्रिकेट टी 20 लीग इंडियन प्रीमियर लीग आजपासून (31 मार्च) सुरू होत आहे. आयपीएलचा 16 वा हंगाम हा अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे. यातील नयमांप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपणातदेखील काही बदल झाले आहेत. आता टीव्हीवर आयपीएल पाहण्याचे दिवस मागे पडले असून अनेक लोक आपल्या स्मार्टफोनवरच आयपीएलचा आनंद घेत आहेत.

त्यातच यंदाचा हंगाम जिओ सिनेमावर फुकटात पाहता येणार आहे. याबाबतची घोषणा व्हायकॉम 18 ने आधीच केली आहे. आता जिओ सिनेमावर आयपीएलचे सामने मोफत पाहण्याबाबतच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होत आहेत.

मात्र जिओ सिनेमावर आयपीएल मोफत पाहण्यासाठी आपल्याकडे जिओचे सीमकार्ड असणे आवश्यक आहे असा आपला समज झाला असेल. मात्र जिओ सिनेमावर सामने पाहण्यासाठी जिओचे सीम कार्ड असणे आवश्यक नाही.

आयपीएलचे सामने मोफत पाहण्यासाठी जिओचे सीम कार्ड असेल तर तुम्हाला जिओ सिनेमावर सर्व सामन्यांचा लाईव्ह आस्वाद घेऊ शकता. यात 12 भारतीय भाषा, 4k फीड, मल्टी कॅम प्रेजेंटेशन अशा फिचर्सचा देखील आनंद घेता येणार आहे. याचबरोबर जिओनेअनेक क्रिकेट फ्रेंडली रिचार्ज देखील लाँच केले आहेत.

जर तुमच्याकडे जिओचे सीमकार्ड नसेल तरी देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण जिओ सिनेमा अॅपवर तुम्हाला सामना मोफत पाहता येणार आहे. मग तुम्ही एअरटेल किंवा VI चे ग्राहक असला तरी काही फरक पडणार नाही. बीएसएनएल असेल तरी कोणताही अडथळा येणार नाही. फक्त गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड करून घ्यायचं. अॅप वापण्यास देखील सोपे आहे. फक्त तुमचा डाटा तेवढा खर्च होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT