When will the Euro Football Championship be held? 
क्रीडा

युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!

वृत्तसंस्था

लंडन : युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याचे नॉर्वे तसेच स्वीडनच्या फुटबॉल संघटनांनी जाहीर केले. युरोपीय महासंघाची स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या दोन देशांनी स्पर्धा लांबणीवर पडल्याचे जाहीर केले.

युरो स्पर्धा ११ जून ते ११ जुलै २०२१ या दरम्यान होईल, असे स्वीडीश संघटनेचे प्रमुख कार्ल एरिक निल्सन यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेस कळवले आहे. त्याच सुमारास नॉर्वे संघटनेने याच स्वरूपाचे ट्‌विट केले. युरोपातील ५५ फुटबॉल संघटनांचा सहभाग असलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सध्या सुरू आहे. या बैठकीस क्‍लब तसेच विविध लीगचे प्रतिनिधीही खास निमंत्रित होते. 

युरो फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा लांबणीवर पडली आहे. अर्थात याचे संकेत युएफाने आपले कोपनहेगनमधील हॉटेल आरक्षण रद्द करून दिले होते. युरो स्पर्धा १२ जून ते १२ जुलैदरम्यान होणार होती. अद्याप पूर्ण न झालेल्या लीग ही युरो स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. युरोपात इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स तसेच जर्मनीतील लीग महत्त्वाच्या आहेत. त्या सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग, विश्वकरंडक पात्रता लढतीही लांबणीवर पडल्या आहेत. युरो स्पर्धेऐवजी लीग पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची सूचना विविध लीगच्या प्रमुखांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT