India vs England 3rd Test Who is Akash Deep Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Eng : कोण आहे बिहारी आकाश दीप? ज्याला पहिल्यांदाच मिळाली टीम इंडियात जागा

India vs England 3rd Test Who is Akash Deep : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे....

Kiran Mahanavar

Who is Akash Deep : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेतून पूर्णपणे बाहेर गेला आहे.

निवडकर्त्यांनी मालिकेतील तीन सामन्यांसाठी आकाश दीपचा टीम इंडियामध्ये बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत झालेल्या दोन कसोटीत 1-1 ने बरोबरीत आहेत.

कोण आहे आकाश दीप?

वेगवान गोलंदाज आकाश दीपचा जन्म 1996 मध्ये बिहारमधील रोहतास येथे झाला. आकाश दीपचा आतापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा आकाश दीप लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांना आकाशने क्रिकेटर व्हावे असे वाटत नव्हते. पण आकाशला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची खूप आवड होती.

2007 च्या टी-20 वर्ल्ड कप भारतीय संघाने विजेतेपद पटकावले तेव्हा आकाशने ठरवले होते की, आपल्यालाही भारतासाठी क्रिकेट खेळायचे आहे. 27 वर्षीय आकाश दीपने बंगालमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला होता.

आकाश दीप इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 7 सामने खेळले असून त्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. आता टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी निवडकर्त्यांकडून कॉल येणे हा आकाश दीपसाठी खास क्षण आहे. चाहत्यांना आशा आहे की आकाशला लवकरच टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळेल.

तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. तर चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळली जाणार आहे.

मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर., कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT