क्रीडा

Who is Arshin Kulkarni : सोलापूर शहराचे नाव IPL मध्ये गाजणार! आर्शीन कुलकर्णी 'या' संघाकडून खेळणार

सोलापूरचा क्रिकेटपटू आर्शीन कुलकर्णी हा आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

सकाळ वृत्तसेवा

Who is Arshin Kulkarni : सोलापूरचा क्रिकेटपटू आर्शीन कुलकर्णी हा आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यामुळे सोलापूरच नाव आता आयपीएलमध्ये गाजणार आहे. मंगळवारी दुबईत झालेल्या आयपीएल लिलावामध्ये अर्शिन कुलकर्णीला वीस लाखांमध्ये लखनऊ सुपर जायन्ट्स या टीमने विकत घेतले आहे.

सोलापुरातून १४ वर्षाखालील मुलांच्या संघात जिल्हा संघाकडून खेळताना अर्शिनने बालपणातच त्याच्या फलंदाजाने क्रिकेटमधील चुणूक दाखवून दिली होती. त्याच्या पालकांनी पुणे येथील केडन्स क्रिकेट अॅकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी पाठविले, तिथे त्याला वरिष्ठांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

त्याच आधारे मागील २ वर्षे तो महाराष्ट्राच्या १६ आणि १९ वर्षाखालील संघाकडून खेळत आहे. त्याच खेळाच्या जोरावर त्याची महाराष्ट्र प्रिमिअर लीगमध्ये निवड झाली त्यातच त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली. त्यामुळे त्याला यावर्षी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात सय्यद मुश्ताक अली चषकासाठी निवडण्यात आले. त्या स्पर्धेत देखील त्याने चमकदार कामगिरी केली होती.

अर्शिन कुलकर्णी याने यापूर्वीच विश्वचषकच्या अंडर १९ क्रिकेट संघात आपले स्थान पक्के केले आहे. तसेच दुबई येथे सुरू असलेल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत महत्वाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT