Dhruv Jurel esakal
क्रीडा

Dhruv Jurel : इशान किशनची जागा घेणारा ध्रुव जुरेल आहे तरी कोण?

Who Is Dhruv Jurel : ध्रुव जुरेलला संधी देत निवडसमितीने इशान किशनचा टीम इंडियातून पत्ता कट केला आहे?

अनिरुद्ध संकपाळ

Dhruv Jurel Replaced Ishan Kishan : बीसीसीआयने नुकतेच इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात इशान किशनच्या ऐवजी 22 वर्षाच्या ध्रुव जुरेलची विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आली आहे. केसी भरतनंतर तो संघातील अतिरिक्त विकेटकिपर आहे.

इशान किशनने सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्याची जागा घेणारा ध्रुव जुरेल हा नक्की आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहेत. जुरेल हा 2020 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार होता. भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुरेल या मालिकेत कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.

ध्रुव जुरेल हा सध्या रणजी ट्रॉफी 2024 मध्ये दमदार कामगिरी करतोय. त्याने 2022 मध्ये उत्तरप्रदेश कडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने रणजी ट्रॉफी मध्ये विदर्भविरूद्ध पहिला सामना खेळला होता.

ध्रुव जुरेलने 15 प्रथम श्रेणी सामन्यात 790 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये आतापर्यंत 249 धावांची सर्वोच्च खेळी केली. याचबरोबर त्याने 10 लिस्ट A सामने आणि 23 टी 20 सामने खेळले आहेत.

आयपीएल 2022 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने ध्रुव जुरेलला 20 लाख रूपये बेस प्राईसला आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. त्याने 2023 च्या हंगामात आयपीएल पदार्पण केलं. त्याने 13 सामन्यात 172.72 च्या स्ट्राईक रेटने 152 धावा केल्या.

शाळेपासूनच क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

जुरेलने त्याचा क्रिकेटपटू म्हणून प्रवास हा शाळेपासूनच सुरू केला. इतर मुलांना क्रिकेट खेळता पाहून तो क्रिकेटकडे आकर्षित झाला. समर कॅम्पपासून सुरूवात करणाऱ्या जुरेलने एक एक स्टेप पुढे जात आता भारतीय संघात प्रवेश मिळवला आहे.

घरच्यांनी परिस्थिती बेताची असतानाही दिली साथ

जुरेलच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. तरी देखील त्यांनी ध्रुवच्या क्रिकेट खेळण्याला पाठिंबा दिला. यासाठी ध्रुवच्या आईने ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय देखील केला. त्या पैशातून ध्रुवसाठी क्रिकेटचं साहित्य खरेदी करण्यात आलं.

19 वर्षाखालील भारतीय संघाचं उपकर्णधारपद

जुरेल हा 2020 मध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार होता. भारतीय संघ 2020 मध्ये अंतिम फेरीत पोहचला होता. यात ध्रुवने देखील मोठे योगदान दिले होते.

प्रथम श्रेणी पदार्पण

ध्रुवने उत्तर प्रदेशकडून खेळताना 17 फेब्रुवारी 2020 ला विदर्भविरूद्ध रणजी पदार्पण केलं. त्याने 19 डावात 790 धावा केल्या आहेत. त्याने नागालँडविरूद्ध 249 धावांची द्विशतकी खेळी देखील केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT