who is Matheesha Pathirana  esakal
क्रीडा

CSK च्या ताफ्यात 'बेबी मलिंगा' म्हणून एन्ट्री केलेला पथिराना आहे तरी कोण?

आयपीएलचा 62 सामना चेन्नईविरुद्ध गुजरातने जिंकला असला तरी या सामन्यात सीएसकेच्या एका गोलंदाजाची चर्चा सुरू आहे.

धनश्री ओतारी

आयपीएलच्या 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 7 विकेट्सनी पराभव केला. जरी हा सामना गुजरातने जिंकला असला तरी या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या एका गोलंदाजाचीच चर्चा सुरू आहे.

हा गोलंदाज आहे श्रीलंकेचा मथीशा पथिराना (Matheesha Pathirana). त्याची गोलंदाजी पाहून सर्वांना मलिंगा आठवला. सध्या त्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर बेबी मलिंगा म्हणून सुरु आहे. त्याने काल झालेल्या सामन्यात गुजरातच्या तीन विकेट पडल्या त्यातील दोन विकेट घेतल्या.

तर हा बेबी मलिंगा म्हणून प्रसिद्ध झालेला पथिराना आहे तरी कोण?

मथीशा पथिराना मुळचा श्रीलंकेचा आहे. आयपीएल २०२२ च्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी माहिन्यात वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील आयसीसी विश्वचषक खेळला गेला. या स्पर्धेत पथिरानाने श्रीलंका संघाचो प्रतिनिधित्व केले होते. त्याची गोलंदाजीची पद्धत माजी दिग्गज लसिथ मलिंगाप्रमाणे आहे. मलिंगा डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यासाठी आणि उत्कृष्ट यॉर्कर चेंडूसाठी ओळखला जायचा. पथिरानाने पहिल्याच आयपीएल सामन्यात या दोन्ही गोष्टी साध्य करून दाखवल्या आहेत.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. मात्र, त्याने याच सीझनमध्ये सीएसकेकडून दिमाखात पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात मथीशाने ३.१ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये २४ धावा खर्च करून दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

मथिशा हा श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे. मथिशाने श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याचवेळी चेन्नईच्या संघाचे लक्ष त्याच्यावर गेले. चेन्नईच्या संघाला त्याची गोलंदाजी शैली आणि त्याच्यामधली गुणवत्ता आवडली आणि त्यांनी थेट मथिशाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आतापर्यंत चेन्नईने त्याला संधी दिली नव्हती. पण गुजरातविरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नईने मथिशाला पदार्पण करण्याची संधी दिली आणि त्यानेही या संधीचे सोने केले.

मथिशा पाथिराना 2020 आणि 2022 मध्ये श्रीलंकेच्या अंडर-19 विश्वचषक संघात होता. सीएसकेने त्याला 20 लाखांच्या किमतीत विकत घेतले आहे. 2020 टी 20 विश्वचषकादरम्यान 175 kmph वेगाने चेंडू फेकून मथिशा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT