Who Is Saurabh Kumar MARATHI NEWS sakal
क्रीडा

Who Is Saurabh Kumar : कोण आहे सौरभ कुमार? ज्याने वयाच्या 30व्या वर्षी टीम इंडियात घेतली जडेजाची जागा

Who Is Saurabh Kumar News 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल केले.

Kiran Mahanavar

India vs England Test Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल केले आहेत. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान आणि सौरभ कुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

रवींद्र जडेजा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. तर केएल राहुलने मांडीला दुखत असल्याची तक्रार केली. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोन खेळाडूकडे लक्ष देत आहे. निवड समितीने उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू सौरभ कुमारला संधी देऊन देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व सिद्ध केले आहे.

सौरभ कुमार आयपीएल खेळत नाही. उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय क्रिकेटपटूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सौरभ कुमारने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या आहेत. भारत अ संघाला तो सामना एक डाव आणि 16 धावांनी जिंकला. रवींद्र जडेजाच्या जागी सौरभ कुमारला दुसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सौरभ कुमारची कारकीर्द

30 वर्षीय सौरभ कुमार हा डावखुरा फिरकीपटू आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 68 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि 12 अर्धशतकसह 2061 धावा केल्या.

तर कुमारने 68 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.41 च्या सरासरीने 290 विकेट घेतल्या आहेत. त्याने 22 वेळा एका डावात 5 विकेट्स आणि 8 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

सौरभ कुमारला भारतीय संघाने बोलावण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020-21 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सौरभचाही समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सौरभने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेकडेही निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. मात्र, लेफ्ट आर्म स्पिनरला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

एयरफोर्सची सोडली नोकरी...!

सौरभ कुमारची क्रिकेटची आवड यावरून स्पष्टपणे दिसून येते की, त्याने क्रिकेटर बनण्यासाठी भारतीय एयरफोर्सची नोकरी सोडली होती. सौरभने 2015 मध्ये ती नोकरी सोडली आणि उत्तर प्रदेशकडून क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. सौरभचा मोठा भाऊ गौरव एयरफोर्समध्ये काम करतो.

कोण आहे सौरभ कुमार?

सौरभ कुमारचा जन्म 1 मे 1993 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथे झाला. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला भारतीय संघातून बोलावण्यात आले. त्याला देशांतर्गत क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. गेल्या काही वर्षांत सौरभ कुमारने भारत अ आणि उत्तर प्रदेशसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगमनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT