नागपूर : खेळाडूंना ग्लॅमर, पैसा व प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या आयपीएलचा बहुप्रतिक्षित लिलाव १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणार आहे. यावर्षीच्या लिलावात मध्यमगती गोलंदाज उमेश यादवसह विदर्भाचे प्रथमच सर्वाधिक नऊ क्रिकेटपटू राहणार आहेत. त्यामुळे यातील कुणाला लॉटरी लागणार, याबद्दल व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह क्रिकेटप्रेमींमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
आयपीएलचा १५ वा हंगाम येत्या एप्रिल-मे महिन्यात सुरू होत आहे. त्याअगोदर शनिवारपासून दोन दिवस बंगळुरूमध्ये लिलाव प्रक्रिया होणार आहे. यावर्षीच्या लिलावात देशविदेशातील तब्बल ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात विदर्भाच्याही नऊ खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात विदर्भाचे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू लिलावात दिसणार आहेत. यावर्षीपासून आयपीएलमध्ये लखनौ व अहमदाबाद हे दोन नवीन संघ दाखल झाल्याने सर्वच खेळाडूंना उत्तम संधी राहणार आहे.
यंदाच्या लिलावात विदर्भाचे उमेश यादव, अष्टपैलू दर्शन नळकांडे, डावखुरा अक्षय कर्णेवार, यष्टीरक्षक जितेश शर्मा, मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अपूर्व वानखेडे, सलामीवीर अथर्व तायडे, युवा मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे, ऑफस्पिनर अक्षय वखरे व मध्यमगती गोलंदाज यश ठाकूरचा समावेश आहे. गतवर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये यातील उमेश आणि दर्शन अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सहभागी झाले होते. मात्र दोघांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे फ्रेंचाईसींनी त्यांना मोकळे (रिलीज) केले. लिलावात उमेशची बेस प्राईस सर्वाधिक दोन कोटींची असून, विदर्भाच्या अन्य खेळाडूंची २० लाख रुपये आहे.
वैदर्भी खेळाडू त्यांची बेस प्राईस
खेळाडू - बेस प्राईस
उमेश यादव - २ कोटी
दर्शन नळकांडे - २० लाख
अपूर्व वानखडे - २० लाख
जितेश शर्मा - २० लाख
अक्षय कर्णेवार - २० लाख
अथर्व तायडे - २० लाख
अक्षय वखरे - २० लाख
आदित्य ठाकरे - २० लाख
यश ठाकूर - २० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.