National Sports Day
National Sports Day  Twitter
क्रीडा

जाणून घ्या 29 ऑगस्टला National Sports Day साजरा करण्यामागचे कारण

सुशांत जाधव

National Sports Day : खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात. तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद, लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

29 ऑगस्ट आणि राष्ट्रीय क्रीडा दिन

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केलीये. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 और 1936) नोंदवलीये. दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरि पुरस्कार असलेल्या पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.

16 व्या वर्षी आर्मीत झाले होते रुजू

देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे झाला. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला. 1922 ते सैनिकाच्या रुपात लष्करात जॉईन झाले. त्यांना पहिल्यापासूनच खेळाची आवड होती. ते एक उत्तम खेळाडू होते. पण त्यांना हॉकीची प्रेरणा मिळाली ती सुभेदार मेजर तिवारी यांच्याकडून जे स्वत: क्रीडा प्रेमी होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हॉकी खेळण्यास सुरुवात केली.

बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीसंघाचे नेतृत्व

हॉकीतील लक्षवेधी कामगिरीनंतर ध्यानचंद यांना 1927 मध्ये 'लांन्स नायक' पदावर बढती देण्यात आली. 1932 मध्ये नायक आणि 1936 मध्ये सुभेदार असे प्रमोशन त्यांना मिळत गेले. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा असे वर्णनही ऐकायला मिळते. एकदा तर चक्क त्यांची हॉकी स्टिक तोडून त्यांत चुंबकिय किंवा अन्य काही गोष्टीचा वापर करण्यात आलाय का का? हे पाहण्यात आले होते. मेजर ध्यानचंद यांनी 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केल होते.

करिअरमध्ये हजारो गोल

ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले. यात त्यांनी जवळपास 1000 गोल डागण्याचा पराक्रम केलाय. हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाने ऐतिहासिक ब्राँझ पदक पटकावल्यानंतर क्रीडा क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 3 डिसेंबर 1979 रोजी ध्यानचंद यांचे निधन झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT