Mirabai Chanu Paris Olympics 2024 sakal
क्रीडा

Mirabai Chanu : पिरियडचा तिसरा दिवस अन्...! मीराबाई चानूने सांगितलं Olympic मेडल हुकण्याचं कारण

Paris Olympic 2024 Mirabai Chanu Weightlifting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा बारावा दिवस भारतीय खेळाडूंसाठी काही खास नव्हता. जिथे सकाळी विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी समोर आली त्यानंतर...

Kiran Mahanavar

Paris Olympic 2024 Mirabai Chanu Finishes Fourth : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा बारावा दिवस भारतीय खेळाडूंसाठी काही खास नव्हता. जिथे सकाळी विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी समोर आली, त्यामुळे विनेश फोगटला तिचा सुवर्णपदक सामना खेळता आला नाही.

यानंतर मीराबाई चानूच्या महिलांच्या 49 किलो वजनी वेटलिफ्टिंग स्पर्धेची देशवासीयांना प्रतीक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून फक्त एक किलो कमी पडली. एकूण १९९ किलो वजन उचलून मीराबाई चौथ्या स्थानावर राहिली आणि पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.

मीराबाई चानू म्हणाली- आजच्या कामगिरीने मी खूश आहे, सर्वांना माहित आहे की मला खूप दुखापती झाल्या आहेत, रिओ (2016 ऑलिम्पिक) मध्ये माझ्यासोबत काय झाले हे सर्वांना माहित आहे. तिथे माझे पदक हुकले होते.

मीराबाई पुढे म्हणाल्या, 'त्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियन बनले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी भारतासाठी रौप्यपदक जिंकले. यावेळीही मी प्रयत्न केला, पण दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत माझी काय अवस्था झाली होती, हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर त्यात माझे 4-5 गेले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खूप कमी वेळ होता, मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही.

मीराबाई म्हणाल्या की, आज माझे नशीबही खराब होते आणि महिला समस्या (पीरियड) देखील होती. आणि आज तिसरा दिवस होता. पण मी माझ्या परीने प्रयत्न केले. यावेळी पदक देऊ न शकल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT