Why Mumbai Indians Removed Rohit Sharma Captaincy sakal
क्रीडा

Rohit Sharma : वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी, 6 टी-20 शतके...; तरी MI ने रोहितकडून का काढून घेतले कर्णधारपद?

Kiran Mahanavar

Why Mumbai Indians Removed Rohit Sharma Captaincy : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्त केले. हार्दिकने आयपीएलच्या मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथमच चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला. आता रोहित त्याच्या ज्युनियरच्या कर्णधारपदाखाली खेळणार की आयपीएलच्या पुढच्या हंगामाआधी कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पुढच्या वर्ल्ड कप खेळणार का रोहित?

त्याच वेळी, भारतात खेळल्या गलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने टीम इंडियाची धूरा सांभाळली होती. सलग 10 सामने जिंकले पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. रोहितने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये 11 डावात 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 597 धावा केल्या.

पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. रोहित शेवटच्या टी-20 वर्ल्ड कपपासून म्हणजेच नोव्हेंबर 2022 पासून या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एक पण सामना खेळला नाही. आता आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

कर्णधारपद का हिसकावले?

रोहितकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून घेण्यामागे कोणतेही मोठे कारण समोर आलेले नाही, परंतु तो या फॉरमॅटपासून लांब जाताना दिसत आहे. वर्ल्ड कपनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतून तो मैदानात परतणार आहे.

कसोटी संघाचे कर्णधारपदही तो सांभाळणार आहे. आता असे दिसते आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारत पुढील टी-20 वर्ल्ड कप खेळणार नाही. एकतर हार्दिककडे कमान सोपवली जाईल किंवा रोहितच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई 5 वेळा चॅम्पियन

मुंबई इंडियन्स संघ हा या लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्याने 1-2 नव्हे तर 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा पाचही वेळा कर्णधार होता. एवढेच नाही तर मुंबईला 10 वेळा प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे. या संघाने 2013 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले होते. यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT