why rohit sharma and virat kohli no included in playing rahul dravid 
क्रीडा

WI vs IND : रोहित-विराट दुसऱ्या वनडेतून का होते बाहेर? कोच राहुल द्रविडचा मोठा खुलासा!

Kiran Mahanavar

India vs West Indies 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. या खेळाडूंऐवजी अक्षर पटेल आणि संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

पण या सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित-विराटला प्लेइंग 11 मध्ये न घेण्यामागचे कारण सांगितले आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे, जेणेकरून ते आशिया कपपूर्वी काही खेळाडूंवर निर्णय घेऊ शकतील.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, 'आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावत होतो. आम्हाला त्या मुलांना संधी द्यायची होती जेणेकरून सर्वात वाईट परिस्थितीतही त्यांना खेळाचा वेळ मिळेल. यामुळे आम्हाला काही खेळाडूंसाठी निर्णय घेण्याची संधी मिळते. आशिया चषकापूर्वी आमच्याकडे या प्रकारच्या मालिकेत फक्त 2-3 सामने आहेत.

द्रविड पुढे म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्हाला जास्त उत्तरे मिळणार नाहीत, परंतु तुम्हाला माहित आहे की आमचे अनेक जखमी खेळाडू एनसीएमध्ये आहेत आणि त्यांच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आम्हाला आणखी काही खेळाडूंना संधी द्यायची आहे, जेणेकरून गरज पडल्यास ते खेळू शकतील.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजच्या कर्णधार होपने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 55 चेंडूत तेवढ्याच धावा केल्या आणि शुभमन गिल (34 धावा, 49 चेंडू) सोबत पहिल्या विकेटसाठी 90 धावा जोडून चांगली सुरुवात केली. पण ही भागीदारी पाहताच लय तुटली आणि भारतीय संघाने पुढच्या 7.2 षटकांत 23 धावांत पाच विकेट गमावल्या. पावसामुळे दोन वेळा खेळात व्यत्यय आला पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 40.5 षटकांत सर्व 10 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 36.4 षटकांत चार गडी गमावून 182 धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT