Why virat kohli not play 1st T20 match against Afghanistan marathi news 
क्रीडा

Ind vs Agf : अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी-20 सामना किंग कोहली का नाही खेळणार? मोठे कारण आले समोर

India Vs Afghanistan T20I Series Virat Kohli News |

Kiran Mahanavar

India Vs Afghanistan T20I Series : 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच भारताच्या टी-20 संघात पुनरागमन करणारा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 खेळणार नाही.

मोहाली टी-20 सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक अपडेट दिले होते की, विराट कोहली 'कौटुंबिक कारणांमुळे' अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार नाही.

आता विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून ब्रेक घेतला असून वैयक्तिक कारणाबाबत मोठा खुलासा झाला आहे. खरंतर आज 11 जानेवारीला विराट कोहलीची मुलगी वामिकाचा वाढदिवस आहे. विराट कोहलीची मुलगी वामिका कोहली आज 3 वर्षांची झाली आहे. वामिकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोहलीने सुट्टी घेतली.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा मुलगी वामिकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपली मुलगी वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवण्याचे नेहमीच टाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT