Rinku Singh Last-Ball Six Not Counted 
क्रीडा

Rinku Singh : शेवटच्या चेंडूवर षटकार तरी रिंकू सिंगच्या खात्यात जमा झाल्या नाही सहा धावा, काय आहे प्रकरण?

Kiran Mahanavar

Rinku Singh Last-Ball Six Not Counted : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रिंकू सिंगने विजयी षटकार मारून जिंकला. तुम्ही सर्वांनी हे पाहिले असेल, पण हे खरे नाही. रिंकू सिंगच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या नाहीत.

भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोश इंग्लिशचे शतक आणि स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने 19.5 षटकांत आठ विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. भारताने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

टीम इंडियाने 19.5 षटकात 208 धावा केल्या होत्या. रिंकू सिंग क्रीजवर होता आणि त्याच्यासमोर शॉन अॅबॉट होता. सीन अॅबॉटने चेंडू टाकला आणि त्यावर रिंकू सिंगने षटकार ठोकला. भारताचा विजय निश्चित झाला आणि विजयी शॉट रिंकू सिंगच्या बॅटमधून आला असे सर्वांना वाटत होते, पण त्याआधीच टीम इंडियाने विजय मिळवला होता.

खरंतर झाले असे की, शॉन अॅबॉटने टाकलेला डावातील शेवटचा चेंडू नो बॉल होता. अशा स्थितीत टीम इंडियाने त्याच नो बॉलवर एका धावेने विजय मिळवला. यामुळे हा षटकार ना रिंकू सिंगच्या खात्यात जमा झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT