wi vs ind 1st odi rohit sharma gets angry on shardul thakur  
क्रीडा

WI vs IND ODI : शार्दुल ठाकूरच्या वृत्तीवर रोहित शर्मा संतापला, LIVE मॅचमध्ये केली शिवीगाळ, VIDEO

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st ODI Rohit Sharma Angry on Shardul Thakur : बार्बाडोस येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रोहित अँड कंपनीने 5 गडी राखून जिंकला. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकांत 114 धावांत गुंडाळला. पण, विंडीजच्या इनिंगदरम्यान शार्दुल ठाकूरने मैदानावर असे काही केले, जे पाहून कर्णधार रोहित शर्मा संतापला आणि त्याने क्लास लावला.

भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून एकापाठोपाठ एक वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबूत लावले. मात्र वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप क्रीजवर उभा होता. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाच्या 19व्या षटकात कुलदीप यादवच्या चेंडूवर शी होपने मिडऑफच्या दिशेने एक शॉट खेळला आणि 2 धावा चोरल्या. शार्दुल ठाकूर चेंडूच्या मागे धावताना खूप आळशी दिसत होता.

शार्दुलला असे पाहून शी होपने आणखी एक धाव घेतली. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा शार्दुल ठाकूरवर चिडला आणि LIVE मॅचमध्येच ओरडायला लागला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. होपने त्याच्या संघासाठी 43(45) धावांची सर्वात मोठी खेळी केली.

29 जुलैला होणार दुसरी वनडे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने विजय तर मिळवलाच पण विंडीज संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या 5 विकेटने विजयासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना 29 जुलै रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा मालिकेवर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरेल, तर यजमान संघ पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT