wi vs ind 1st t20 Team India SAKAL
क्रीडा

Arshdeep Singh: W, W, W, W... हे W चार विकेट्स नाही तर..., अर्शदीपचे हे W पडले महागात!

अर्शदीपमुळे सामना हरला... ते 4 बॉल अन् 4 धावांनी पराभव

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st T20 Arshdeep Singh : कसोटी आणि एकदिवसीय मालिकेवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिका विजयाने सुरू करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. टिळक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी टी-20 मध्ये पदार्पण केले तर अर्शदीप सिंग दीर्घ कालावधीनंतर संघात परतला. एकंदरीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरला होता. युवा संघाची स्पर्धाही तशीच अपेक्षित होती, पण संघ आणि चाहत्यांनी जे विचार केले होते, ते होऊ शकले नाही आणि त्याने विचारही केला नव्हता, ते घडले.

वेस्ट इंडिजला 149 धावांवर रोखल्यानंतरही टीम इंडियाचा पराभव झाला. शुभमन गिल, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन हे सगळे फ्लॉप ठरले. फलंदाजांची खराब कामगिरी हे पराभवाचे कारण आहे. एकेकाळी टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करणार असल्याचं दिसत होतं, पण टीम चुकली. W, W, W, W हे W चार विकेट्स नाही तर वाईड आहे. अर्शदीपच्या षटकातील त्या 4 धावा संघाच्या पराभवाचे कारण ठरल्या.या पराभवातून अर्शदीपला एक धडा मिळाला असेल की प्रत्येक धावेची किंमत काय असते.

एका षटकात 10 चेंडू

खरं तर, 18 व्या षटकात वेस्ट इंडिजने 4 बाद 134 धावा केल्या होत्या. यानंतर 19व्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीपवर आली.अर्शदीपने 1 षटकात एकूण 10 चेंडू टाकले, ज्यात त्याने 4 वाईड टाकले. म्हणजेच अर्शदीपच्या त्या 4 चेंडूमुळे टीम इंडिया 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

त्याच्या 19व्या षटकात त्याने एकूण 10 चेंडू टाकले असले तरी त्याने शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांनाही बाद केले. फेब्रुवारीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या अर्शदीपच्या 4 चेंडूंमुळे टीम इंडियाने हा सामना हारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT