wi vs ind 1st t20  
क्रीडा

Wi vs Ind : दूरदर्शन अन् फॅनकोड नाही तर... येथे पहा भारतविरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी-20 सामना 'फ्री'

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st T20 : कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा भारतीय संघ गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर रोहित आणि कोहली या टी-20 संघात समाविष्ट नाहीत. संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव आहे.

या मालिकेत सलामीवीर यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जैस्वाल आणि टिळक यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि दोघांना पहिल्यांदाच टी-20 संघात स्थान मिळाले आहे. सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7.30 वाजता होईल.

एकदिवसीय आणि कसोटी सामने भारतीय वेळेनुसार उशिरा संपत होते, परंतु चाहत्यांना टी-20 मालिकेचा आंनद घेता येणार आहे. चला जाणून घेऊया हा सामना कुठे खेळला जाणार आहे आणि चाहते थेट कसे पाहू शकतील...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी, कुठे, किती वाजता खेळल्या जाणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे रात्री 8 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी होईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर तुम्ही थेट पाहू शकाल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना दूरदर्शन स्पोर्ट्स चॅनलवर प्रसारित होणार आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे थेट प्रवाह फॅन कोड वेबसाइट आणि अॅपवर उपलब्ध असेल. Jio Cinema वेबसाइट आणि अॅपवर विनामूल्य पाहू शकतात. तुम्ही https://www.esakal.com/krida वर लाइव्ह अपडेट्स आणि स्कोअर फॉलो करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT