wi vs ind 2nd t20 
क्रीडा

Wi vs Ind : 'तुम्ही त्याला संघात घेतलंच का?...' माजी क्रिकेटपटूने पांड्याच्या कर्णधारपदावर उपस्थित केले प्रश्न

Kiran Mahanavar

Wi vs Ind 2nd T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आता माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेही टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवर अन् कर्णधार हार्दिक पांड्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अक्षर पटेलला गोलंदाजी न करण्याच्या निर्णयावर त्याने टीका केली आणि म्हटले की, जेव्हा तुम्ही त्याला गोलंदाजी देणार नव्हता, तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये तरी का घेतला.

गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या तीन फिरकी गोलंदाजांना भारताने खेळवले, मात्र संपूर्ण सामन्यात अक्षरला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत माजी खेळाडूने आपला राग हार्दिक पांड्यावर काढला आहे.

खरं तर, वेस्ट इंडिजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काइल मेयर्स, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि अकील हुसेन या स्वरूपात एकूण चार डावखुरे फलंदाज आहेत, जे वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजीसाठी आले. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने त्याला एकही षटक टाकू दिले नाही.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, अक्षर पटेलला एकही षटक टाकता आले नाही. माझा प्रश्न आहे की जर तुम्ही अक्षर पटेलला डावखुऱ्या फलंदाजांमुळे गोलंदाजी केली नाही, तर तुम्ही त्याला घेतल का होता. तुम्ही सहाव्या गोलंदाजाचा अजिबात वापर केला नाही. डावखुरा गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजासमोर गोलंदाजी करू शकतो. अकील हुसेनने तिलक वर्माविरुद्ध गोलंदाजी करून त्याला बाद केले. मात्र, अक्षर पटेलला गोलंदाजी करायला दिली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 19 व्या षटकात 8 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव असून आता आणखी एक सामना गमावल्यास मालिका गमवावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

FDA Crime : पळा पळा अधिकारी आले...; दुकाने बंद करून अनेक व्यापारी गेले पळुन

Khadakwasala Bridge : खडकवासला पुलाचे आयुष्य वाढले; जड वाहतूक लवकरच होणार सुरू

SCROLL FOR NEXT