Wi vs Ind T20 Squad 
क्रीडा

WI vs IND 5th T20 : सलग दोन विजयानंतरही टीम इंडियाचे प्लेइंग-11 बदलणार, या खेळाडूची संघात एन्ट्री?

Kiran Mahanavar

WI vs IND 5th T20 Team India Playing 11 : भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. यासह मालिका 2-2 अशी बरोबरी साधली. आता नजर आहे ती पाचव्या टी-20 कडे जी आज म्हणजेच रविवारी कोणत्याही ब्रेकशिवाय खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत व्यवस्थापन कोणत्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी देते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल पाचव्या टी-20 मध्ये पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. गिल (77) आणि जैस्वाल (84*) या जोडीने चौथ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजची जोरदार धुलाई केली.

इशान किशनला चौथ्या टी-20 मध्ये स्थान मिळाले नाही, त्यामुळे आता पाचव्या सामन्यात त्याचे पुनरागमन करणे फार कठीण आहे, जैस्वालने चौथ्या सामन्यात शानदार 84 धावा करून स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचवेळी संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात सॅमसनला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. त्याचबरोबर टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर उतरेल.

तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर उतरतील. या संपूर्ण मालिकेत तिलक वर्मानी अप्रतिम फलंदाजी केली आहे. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनचा क्रमांक येणार आहे. सॅमसन संघाचा यष्टिरक्षकही आहे. त्याचबरोबर संघाकडे अक्षर पटेलच्या रूपाने फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूही आहे.

पाचव्या सामन्यात पुन्हा एकदा युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे संघाचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. ज्या खेळाडूंसोबत टीम इंडियाने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवला ते शेवटच्या सामन्यातही दिसतील आणि प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

पाचव्या टी-20 साठी संभाव्य प्लेइंग 11 :

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT