ajinkya rahane replaces shreyas iyer sakal
क्रीडा

Team India : रोहित शर्माच्या 'या' आवडत्या खेळाडूची कारकीर्द अजिंक्य रहाणेने केली उद्ध्वस्त

भारतीय कसोटी संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात आला पण...

Kiran Mahanavar

Ajinkya Rahane Wi vs Ind : भारतीय कसोटी संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने प्रदीर्घ कालावधीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संघात पुनरागमन केले. कसोटी संघात पुनरागमन केल्यानंतर अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली आहे. WTC 2023 मध्ये रहाणेने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या.

अशा स्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला भारतीय कसोटी संघात केवळ स्थानच देण्यात आलेले नाही, तर त्याला उपकर्णधारही करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाल्यापासून दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडणाऱ्या श्रेयस अय्यरला संधी मिळणे अधिक झाले आहे.

भारतीय कसोटी संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. अशा स्थितीत भारतीय कसोटी संघात पुनरागमन केल्यानंतर श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी मिळणार नाही, कारण श्रेयस अय्यरही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण टीम इंडियामध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे हा त्याच्यापेक्षा चांगला पर्याय आहे.

एवढेच नाही तर अजिंक्य रहाणेकडे श्रेयस अय्यरपेक्षा जास्त अनुभव आहे. अजिंक्य रहाणेने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्वही केले असून त्याच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळू शकतो. याच कारणामुळे श्रेयस अय्यरला त्याच्यामुळे कसोटी संघात संधी मिळणे कठीण आहे. श्रेयस अय्यर हा रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आता अजिंक्य रहाणे संघात परतला आहे.

श्रेयस अय्यर विरुद्ध अजिंक्य रहाणे

श्रेयस अय्यरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 16 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 666 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत कसोटीत 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत, तर दुसरीकडे अजिंक्य रहाणेने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 83 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 142 डावांमध्ये 38 च्या सरासरीने 5066 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 26 अर्धशतकांचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT