WI vs IND Series 2023 Team India Squad | Ajinkya Rahane Vice Captain 
क्रीडा

WI vs IND : रहाणेला उपकर्णधार बनवण्यावरून झाला मोठा गोंधळ, BCCI ला घेतले धारेवर

Kiran Mahanavar

WI vs IND Ajinkya Rahane Vice Captain : बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने जुलैमध्ये होणाऱ्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघ जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर निवड समितीचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचे कारण म्हणजे अजिंक्य रहाणे बाबत घेतलेला निर्णय. रहाणेला निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले आहे. निवड समितीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. (WI vs IND Series 2023 Team India Squad | Ajinkya Rahane Vice Captain)

रहाणेला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कसोटी संघातून वगळण्यात आले होते. यानंतर त्याची कारकीर्द संपली असे वाटत होते, पण या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी केली आणि संघात पुनरागमन केले. रहाणेची कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघात निवड झाली. एका सामन्यानंतर आता त्याला पुन्हा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

रहाणेची उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर एक प्रश्न उपस्थित होत आहे आणि तो म्हणजे बीसीसीआय खरच भविष्याचा विचार करत आहे का?. सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. अनेक युजर्सनी ट्विट करून या निर्णयावर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, रहाणेला एका सामन्याच्या आधारे उपकर्णधार बनवण्यात आले आहे, जे सांगते की समिती रोहितनंतर कर्णधार तयार करू इच्छित नाही.

त्याचवेळी एका युजरने लिहिले की, बोर्ड भविष्यासाठी संघ बनवण्याबाबत आणि तरुणांना तयार करण्याबाबत बोलतो, मात्र ते काम करत नाही आणि केवळ आयपीएलच्या आधारे चालत आहे. तर काही लोकांना हा निर्णय आवडला असून, त्याऐवजी रोहित, रहाणे यांना कसोटी संघाचा कर्णधार बनवायला हवा.

वेस्ट इंडिज दौरा हा असा दौरा आहे जिथे बीसीसीआय तरुण खेळाडूंना तयार करू शकते. अशा परिस्थितीत निवडकर्ते या दौऱ्यासाठी त्या खेळाडूला संघाचा उपकर्णधार बनवू शकतात, ज्याच्याकडे भविष्यात संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यात शुबमन गिल हे एक नाव होते.

मात्र निवड समितीने असा निर्णय न घेता जुन्या खेळाडूवर विश्वास ठेवला. रहाणे मात्र एक चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. या दौऱ्यावर विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात

Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय

Latest Marathi News Live Update: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसवर दगडफेक

Pune Court: वकील, पक्षकारांची पार्किंगसाठी वणवण; जिल्हा न्यायालय परिसर, आवाराबाहेर गाडी लावल्यास दंडाचाही भुर्दंड

Cyber Scam: गुंतवणुकीच्या आमिषाने साडेचार कोटींना गंडा; पुण्यातील तिघांची फसवणूक, तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT