Wi vs Ind Squad Test 2023 Cheteshwar Pujara  SAKAL
क्रीडा

Wi vs Ind : टीम इंडियातून डच्चू मिळाल्यावर कशी आहे पुजाराची मानसिक स्थिती? वडिलांनी केला मोठा खुलासा

भारतीय कसोटी संघातून पुजाराची हकालपट्टी अन्...

Kiran Mahanavar

Wi vs Ind Squad Test 2023 Cheteshwar Pujara : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजाराची भारतीय कसोटी संघातून हकालपट्टी झाल्याने अनेक दिग्गजांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावात पुजारा फ्लॉप ठरला होता, त्यामुळे त्याला संघातून बाहेर काढले.

पुजाराच्या जागी यशस्वी जैस्वालला कसोटी संघात संधी मिळाली आहे. निवड समितीच्या या निर्णयावर चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चेतेश्वर पुजाराचे वडील?

अरविंद पुजाराने इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या संवादात म्हटले आहे की, त्यांचा मुलगा मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे, मी निवडीवर भाष्य करू शकत नाही, परंतु दुलीप ट्रॉफी संघ जाहीर झाल्यापासून तो नेटमध्ये जोरदार सराव करत आहे.

पुजाराच्या वडिलांनी पुढे सांगितले की, चेतेश्वर यापुढेही काउंटी क्रिकेट खेळत राहील. वडील आणि कोच म्हणून चेतेश्वर आता पुनरागमन करेल यावर मला विश्वास आहे.

चेतेश्वर पुजारा दुलीप ट्रॉफी खेळणार

चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागीय संघात सामील करण्यात आले आहे. पुजारा 7 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.

यशस्वी जैस्वालच्या जागी पुजाराचा पश्चिम विभागात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड यांच्या जागी पश्चिम विभागात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. यशस्वी आणि ऋतुराज हे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा भाग आहेत. 28 जूनपासून दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT