Wi vs Ind T20 Rahul Dravid  sakal
क्रीडा

Wi vs Ind : "दोन पराभवानंतर कमबॅक करू शकलो पण..." कोच राहुल द्रविडने सांगितले टी-20 मालिकेतील अपयशाचे कारण

Kiran Mahanavar

Wi vs Ind T20 Rahul Dravid : भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात संघाला 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आणि मालिका 3-2 ने गमावली. या दौऱ्यातील टीम इंडियाच्या कामगिरीबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, काही वेळा एकाच वेळी सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करणे कठीण जाते.

टी-20 मालिकेतील पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, आम्ही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली. टी-20 मध्येही आम्ही 2 सामने गमावल्यानंतर चांगले पुनरागमन करू शकलो, परंतु आम्हाला अपेक्षेप्रमाणे मालिका संपवता आली नाही. पहिल्या 2 सामन्यात आणि पाचव्या सामन्यात आम्ही काही चुका केल्या, त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यांमध्ये आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु हा युवा संघ आहे ज्यात सातत्याने सुधारणा होत आहे.

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, आम्हाला या मालिकेत युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. आम्ही काही कॉम्बिनेशन देखील वापरून पाहिले आणि आमच्यासाठी काही सकारात्मक गोष्टी होत्या. आमच्या येथे असलेल्या संघात आम्हाला काही गोष्टींमध्ये फारसे बदल करण्याची संधी मिळाली नाही, परंतु आम्ही भविष्य लक्षात घेऊन काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आम्हाला टी-20 मध्ये आमच्या फलंदाजीत अधिक खोली आणायची आहे. मग यात कशी सुधारणा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, पण गोलंदाजी आक्रमण कमकुवत न करता संघात दोन्ही बाजूंचा समतोल दिसला पहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT