IND vs WI Shubman Gill and Yashasvi Jaiswal Record 
क्रीडा

WI vs IND : एक शेर तर दूसरा सव्वा शेर! शुभमन अन् यशस्वी या जोडीने अमेरिकेत घातला राडा अन्...

Kiran Mahanavar

IND vs WI Shubman Gill and Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर अप्रतिम कामगिरी केली. या जोडीने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. गिल आणि यशस्वी या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. यासह युवा खेळाडूंनी केएल राहुल आणि रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारताच्या सर्वोत्तम सलामीच्या भागीदारीचा विक्रम केला आहे. दोन्ही युवा खेळाडूंनी केवळ 94 चेंडूत वेगवान फलंदाजी करत 165 धावा केल्या. जैस्वाल आणि गिल यांनी संयुक्तपणे रोहित शर्मा आणि केएल राहुलची बरोबरी केली आहे. रोहित आणि राहुल यांनी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 165 धावा जोडल्या होत्या.

  • दिपक हुड्डा - संजू सॅमसन 176 धावा आयर्लंडविरुद्ध 2022

  • केएल राहुल - रोहित शर्मा 165 धावा श्रीलंकेविरुद्ध 2017

  • शुभमन गिल - यशस्वी जैस्वाल 165 धावा वेस्ट इंडीजविरुद्ध 2023

  • शिखर धवन - रोहित शर्मा 160 धावा आयर्लंडविरुद्ध 2018

यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम

चौथ्या टी-20 सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने तुफानी फलंदाजी केली. त्याने 51 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यासह, तो T20I क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण भारतीय खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

भारतासाठी टी-20 मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू

  • 20 वर्षे 143 दिवस रोहित शर्मा (50* VS दक्षिण आफ्रिका डर्बन 2007)

  • 20 वर्षे 271 दिवस टिळक वर्मा (51 VS वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स 2023)

  • 21 वर्षे 38 दिवस ऋषभ पंत (58 VS WI चेन्नई 2018)

  • 21 वर्षे 227 दिवस यशस्वी जैस्वाल (84* VS वेस्ट इंडीज लॉडरहिल 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT