Wi vs Ind T20 Hardik Pandya Statement
Wi vs Ind T20 Hardik Pandya Statement 
क्रीडा

Wi vs Ind T20: 'हारणे चांगले...' टीम इंडियाने मालिका गमावल्यानंतर हार्दिक पांड्यानं पुन्हा केलं अजब विधान

Kiran Mahanavar

Wi vs Ind T20 Hardik Pandya Statement : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह विंडीज संघाने या मालिकेत 3-2 असा विजय मिळवला. 12 टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. अलीकडेच हा विक्रम भारताचा नवा टी-20 कर्णधार बनलेल्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मोडला. आपल्या विचित्र विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या हार्दिक पांड्याने टीम इंडियाच्या मालिका पराभवावर मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, मी आलो तेव्हा आम्ही लय गमावली आणि परिस्थितीचा फायदा उठवता आला नाही. मला विश्वास आहे की आम्ही स्वतःला आव्हान देऊ. आम्ही अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करत राहू. आम्हाला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. संघातील मुलं कशी आहेत हे मला माहीत आहे. आम्हाला शोधण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. कधी कधी हरणे चांगले असते.

हार्दिक पुढे म्हणाला की, आम्ही खूप काही शिकलो आहे. मुलांनी चांगले खेळ केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हार आणि विजय होतच राहतात. पुढील T20 विश्वचषक येथे होणार आहे. मला आशा आहे की येथे मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील. या क्षणी, सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे मी आभार मानतो.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्याबद्दल सांगायचे तर, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने वेस्ट इंडिजला 166 धावांचे लक्ष्य दिले होते.

टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने 61 धावांची खेळी केली. सूर्याशिवाय या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या तिलक वर्माने 27 धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या डावात रोमारियो शेफर्डने चार, अकिल होसेन आणि जेसन होल्डरने दोन, तर रोस्टन चेसने एक बळी घेतला. वेस्ट इंडिजने अवघ्या 18 षटकांत दोन गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला. ब्रँडन किंगने 85 आणि निकोलस पूरनने 47 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT