Wi vs Ind 1st ODI 
क्रीडा

Wi vs Ind 1st ODI: प्लेइंग इलेव्हनमध्ये नसूनही सॅमसन उतरला मैदानात? नक्की भानगड काय, घ्या जाणून

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st ODI Suryakumar Yadav wear Sanju Samson’s jersey : कर्णधार रोहित शर्माने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आणि वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने अवघ्या 114 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने तीन आणि कुलदीप यादवने चार बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने इशान किशनच्या 52 धावांच्या जोरावर पाच विकेट्सवर 118 धावा केल्या आणि सामना जिंकला.

या सामन्यात जेव्हा नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली, तेव्हा संजू सॅमसनच्या चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला. सॅमसनची पुन्हा एकदा एकदिवसीय संघात निवड झाली आणि चाहत्यांना आशा होती की, तो वेस्ट इंडिजविरुद्ध आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

परंतु कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर इशान किशनची निवड केली. यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली, मात्र सामना सुरू झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. खरं तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सूर्या सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरला आणि प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही सॅमसनला खेळाचा भाग बनवले. सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने घातलेल्या संजू सॅमसनच्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला छोट्या धावसंख्येवर रोखले. यानंतर टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच प्रयोग केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीला येण्याच्या मूडमध्ये नव्हते. ईशान आणि गिलने डावाची सुरुवात केली. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला. हार्दिक चौथ्या क्रमांकावर तर जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे. शार्दुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, भारताच्या पाच गडी बाद झाल्याने कर्णधार रोहितला फलंदाजीसाठी उतरून सामना संपवावा लागला.

इशान किशनने सर्वाधिक 52 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना संधीचा फायदा उठवता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT