will young catch 2022 sakal
क्रीडा

विल यंगचा भन्नाट कॅच वर्षातील सर्वोत्तम? व्हिडिओ बघून तुम्हीच ठरवा

विल यंग याचा अप्रतिम झेल पाहून इयान बिशप ही झाले आवाक

सकाळ वृत्तसेवा

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या विल यंग (Will Young) याने एक अफलातून कॅच घेतल्याचे पाहायला. त्याने घेतलेला झेल पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मार्को जेनसन याने मारलेल्या फटका विल यंगने अप्रतिमरित्या पकडला. सीमारेषेजवळ त्याने घेतलेल्या अप्रतिम झेलच सर्वत्र कौतुक होत आहे. त्याना आपल्या फिल्डिंगन प्रेक्षकांची मने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात धावफलकावर 219 धावा असताना संघाला सातवा धक्का बसला. कॉलिन डी ग्रँडहोम याच्या गोलंदाजीवर विल यंगने टिपलेल्या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. जेनसन याने मिड विकेटवरून हवेत फटका खेळला. यंग याने पळत जाऊन याचे झेलमध्ये रुपांतर केले. त्याने घेतलेला झेल पाहून सर्वत्र एकच शांतता पसरली. खुद्द विल यंगही काही काळ स्तब्ध उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. समालोचक इयान बिशपही झेल पाहून आश्चर्यचकित झाल्याचे दिसले. हा झेल या वर्षातील सर्वोत्तम असल्याचे बोलले मानले जात आहे.

पहिल्या डावात 364 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 9 बाद 354 धावांवर घोषीत केला. न्यूझीलंडसमोर त्यांनी 426 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात 293 धावांत आटोपलेल्या न्यूझीलंडसाठी हे आव्हान खूपच अवघड आहे. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने अवघ्या 80 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. अखेरच्या दिवशी सामना जिंकणे न्यूझीलंडसाठी अवघड आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी दक्षिण आफ्रिकेला 276 धावांनी पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे. एवढेच नाही तर मालिकाही वाचवू शकतात. जर न्यूझीलंडने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले तर मालिका त्यांच्या पदरात पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT