Wimbledon 2021 : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेची जोडीदार बेथानी माटेक सँड्सच्या साथीनं विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली. महिला दुहेरीतील पहिल्या फेरीत या दोघींनी अमेरिकेची डेजेरे क्रॉचिक आणि चिलीची एलेक्सा गौराला 7-5, 6-3 असे पराभूत केले. विम्बल्डनपूर्वी सानिया आणि बेथानी माटेक जोडीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाचा दणका बसला होता. (wimbledon 2021 sania mirza and bethanie mattek sands knock out 6th seeds krawczyk and guarachi in 1st round)
हा पराभव विसरुन आणि आपल्या खेळात सुधारणा करत या जोडीनं विम्बल्डनमध्ये दिमाखदार खेळ दाखवला. पहिल्या फेरीतील सामन्यात सानिया-बेथानी यांच्यात चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. या जोडीने 1 तास 27 मिनिटे रंगलेल्या सामन्यात अमेरिका आणि चिलीच्या जोडीला पराभूत केले.
भारत आणि अमेरिकन जोडी तिसऱ्या सेटमध्ये दबावात दिसली. बेथानी सर्विस करताना सात वेळा अडखळली. अमेरिकन खेळाडूने तीन डबल फॉल्टनंतर तीन ब्रेक प्वाइंट वाचवत सर्विसही वाचवली. सानियाच्या अप्रतिम स्मॅशवर या जोडीने पहिला सेट आपल्या नावे केला. सानिया आणि बेथानी जोडीने पुन्हा एकदा एलेक्साची सर्विस ब्रेक करत 3-1 अशी आघाडी घेतली. या आघाडीसह सेटसह या जोडीने सामना खिशात घातला.
भारताची आणखी एक महिला स्टार विम्बल्डनच्या मैदानात उतरणार आहे. अंकिता रैना गुरुवारी अमेरिकेची पार्टनर लॉरेन डेविडच्या साथीने विम्बल्डनच्या कोर्टवर खेळताना दिसणार आहे. पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये दोन भारतीय महिला खेळाडूंनी वर्णी लागली आहे. अंकिता सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळथ आहे. यावर्षीच तिने ऑस्ट्रेलिया ओपनमधून टेनिस जगतातील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभाग पदार्पण केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.