Elina Svitolina Defeat Iga Swiatek esakal
क्रीडा

Wimbledon 2023 : 9 महिन्यापूर्वीच आई झालेल्या युक्रेनच्या एलिनाने नंबर 1 इगाला दिला पराभवाचा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

Wimbledon 2023 : विंम्बल्डन 2023 च्या महिला एकेरीमध्ये आज एक मोठा उलटफेर झाला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इगा स्वियातेकला पराभवाचा धक्का बसला. हा धक्का एलिना स्वितोलिने दिला. विशेष म्हणजे युक्रेनच्या एलिना ही 9 महिन्यापूर्वीच आई झाली आहे. त्यानंतर तिने कोर्टवर जोरदार कमबॅक केले. तिने इगाला 7 -5, 6-7 (5), 6-2 असा पराभव करून सेमी फायनल गाठली.

युक्रेनच्या 28 वर्षाच्या एलिनाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलीला जन्म दिला होता. एलिनाने या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरमध्ये खेळत टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं होतं. (Elina Svitolina Defeat Iga Swiatek)

फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचल्यानंतर आता एलिनाने विम्बल्डनमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता. सामना जिंकल्यानंतर एलिना म्हणाली की, 'जर या स्पर्धेच्या सुरूवातीला मला सांगितले असते की तू जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूला हरवून सेमी फायनलमध्ये प्रवेश करशील तर मी हे खूप झालं असं म्हटलं असतं.' (Wimbledon Women's Single News)

चारवेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या इगा स्वियातेकने गेल्या महिन्यात तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकली होती. मात्र ती पहिल्यांदांच विम्बल्डनच्या (Wimbledon News) क्वार्टर फायनलमध्ये पोहचली होती. इगाला हरवलेल्या एलिनाचा आता सेमी फायनलमध्ये मार्केटा वांद्रोसोवाशी सामना होणार आहे. तिने चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाचा 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT