Barbora Krejcikova and Jasmine Paolini  Sakal
क्रीडा

Wimbledon 2024: पाओलिनीने जिंकली ऐतिहासिक सेमीफायनल; क्रेसिकोवाकडून रायबाकिनाला पराभवाचा धक्का

Wimbledon 2024 Semifinal: जास्मीन पाओलिनी आणि बार्बरा क्रेसिकोवा यांनी विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

Wimbledon 2024: विम्बल्डन २०२४ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून गुरुवारी (११ जुलै) महिलांची एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. उपांत्य फेरीत ७ व्या मानांकित जास्मीन पाओलिनी आणि ३१ व्या मानांकित बार्बरा क्रेसिकोवा यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पाओलिनीने डोना वेकिचला नमवलं

इटलीच्या पाओलिनीने डोना विकेचला 2-6, 6-4, 7-6 (8) अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. २ तास ५१ मिनिटे चाललेल्या या सामन्यातील विजयामुळे आता पाओलिनी अंतिम सामन्यात पोहचली आहे. ओपन एरामध्ये अंतिम सामना गाठणारी ती इटलीची पहिली टेनिसपटू ठरली आहे.

याशिवाय पाओलिनी आणि विकेच यांच्यातील सामना विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचा सर्वाधिक काळ चालेला उपांत्य सामना ठरला आहे. यापूर्वी सेरेना विलियम्स विरुद्ध एलिना डेमेन्तिवा यांच्यात २००९ च्या विम्बल्डनमध्ये झालेला उपांत्य सामना २ तास ४९ मिनिटे झाला होता.

क्रेसिकोवाने एलिना रायबाकिनाला केलं पराभूत

क्रेसिकोवाने चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाला २ तास ७ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात 3-6, 6-3, 6-4 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. आता क्रेसिकोवा दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. तिने यापूर्वी २०२१ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.

अंतिम सामना

आता शनिवारी (१३ जुलै) पाओलिनी आणि क्रेसिकोवा यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. ऑल इंग्लंड क्लब येथे रंगणार आहे. दरम्यान, या दोघींमधील विजेत्या खेळाडूला 2,700,000 पाउंड्स बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या खेळाडूला 1,400,000 पाउंड्स बक्षीस मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT