Novak Djokovic Sakal
क्रीडा

Let's keep going! मुलासाठी नोव्हाक जोकोविच बनणार कोच; निवृत्तीवर भाष्य, पाहा व्हिडिओ

Novak Djokovic on his Son: विम्बल्डन २०२४ मध्ये उपविजेता ठरलेल्या जोकोविचने त्याच्या मुलाचा कोच बनण्याबद्दल भाष्य केलं आहे.

Pranali Kodre

Novak Djokovic on Coaching to his Son: विम्बल्डन २०२४ स्पर्धेत रविवारी (१४ जुलै) २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात त्याने सातवेळच्या विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.

अल्काराजने जोकोविचला सलद दुसऱ्यांला विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने गेल्यावर्षी देखील जोकोविचला विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

पण असे असले तरी गेल्याच महिन्यात गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असतानाही त्यातून सावरून विम्बल्डनची अंतिम फेरी गाठल्याबद्दल ३७ वर्षीय जोकोविचचेही सध्या कौतुक होत आहे.

दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर उपविजेता ठरलेला जोकोविच त्याच्या कुटुंबाबद्दल बोलताना भावूक झाला होता. त्याने त्यांचे आभार मानताना त्याची दोन्ही मुलं स्टीफन आणि तारा या दोघांनाही टेनिस आवडत असल्याचे सांगितले.

तसेच त्यानं असंही सांगितलं की त्याच्या मुलाने खरंच जर टेनिस गांभीर्याने खेळायचे ठरवले तर निवृत्तीनंतर त्याचा प्रशिक्षक बनण्याचाही तो विचार करेल.

जोकोविच म्हणाला, 'माझी पत्नी, आय लव्ह यू. मला पाठिंबा देण्यासाठी आणि इथे असण्यासाठी आभार.'

जोकोविच पुढे म्हणाला, 'माझी दोन गोंडस मुलं, माझ्या चेहऱ्यावर रोज हसू आणण्यासाठी तुमचे आभार. प्रत्येकवर्षी त्यांना असं कोर्टवर क्लोझिंग सेरेमनीवेळी पाहाताना माझे डोळे पाणावतात. ते माझे छोटे एजंल आहेत.

'त्यांना आता अधिकाधिक टेनिस आवडायला लागलंय. माझ्या मुलाचा प्रशिक्षक म्हणून पुढे जाण्याचे धाडस आहे की नाही मला माहित नाही. मुला, आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण जर तुझी टेनिसच खेळायची इच्छा असेल, तर मी तुझ्यासोबत असेल.'

जोकोविचने आत्तापर्यंत सर्वाधिक २४ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यातील ७ विजेतीपदं त्याने विम्बल्डनमध्ये मिळवली आहेत. जोकोविचचा मुलगा स्टिफान सध्या १० वर्षांचा आहे. तो अनेकदा जोकोविचबरोबर टेनिस खेळतानाही दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT