Wimbledon Women's Singles 2023 Marketa Vondrousova esakal
क्रीडा

Wimbledon Women's Single 2023 : मार्केता वांद्रोसोव्हाने इतिहास रचला! विंम्बल्डनमध्ये 55 वर्षात जे घडलं नाही ते करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Wimbledon Women's Singles 2023 Marketa Vondrousova : चेक प्रजासत्ताकची बिगर मानांकित महिला टेनिसपटू मार्केता वांद्रोसोव्हाने विंम्बल्डन महिला एकेरीचा खिताब पटकावत इतिहास रचला. तिने ट्युनिशियाच्या ओन्स जाबेअरचा 6-, 6-4 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.

ती ओपन एरामधील विंम्बल्डन महिला एकेरीचा खिताब जिंकणारी पहिली बिगर मानांकित महिला टेनिसपटू ठरली आहे. गेल्या 55 वर्षात विंम्बल्डनमध्ये एकाही बिगर मानांकित महिला टेनिसपटूला महिला एकेरीचे विजेतपद जिंकता आले नव्हते. ही किमया मार्केताने 2023 मध्ये करून दाखवली. (Wimbledon 2023 News)

चेक प्रजासत्ताकची मार्केता वांद्रोसोव्हा आणि ट्युनिशियाची ओन्स जेबर या दोघी विंम्बल्डन महिला एकेरीच्या फायनलमध्ये पोहचल्या होत्या. सहावी मानांकित खेळाडू ओन्स जेबरने 2019 मध्ये देखील विंम्बल्डनची फायनल गाठली होती. मात्र त्यावेळी तिचा अॅश्ले बार्टीने पराभव केला होता.

यंदा तिच्यासमोर बिगर मानांकित वांद्रोसोव्हाचे आव्हान होते. मात्र हे आव्हानही तिला पेलवले नाही. पहिल्या सेटपासूनच वांद्रोसोव्हाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड निर्माण केली.

मार्केताने पहिला सेट 6 - 4 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेट देखील तिने दमदार खेळ करत 6 - 4 असा खिशात टाकला. तिने ओन्सला सरळ सेटमध्ये मात देत विजेतेपदाला गवसणी घातली.

विजयानंतर मार्केता म्हणाली की, 'मी खूप आव्हानात्मक परिस्थितीतून गेले. गेले वर्ष माझ्यासाठी खूप कठिण होतं आणि आता मी ही ट्रॉफी पकडली आहे हे अविश्वसनीय आहे.' मार्केता गेल्या वर्षी मनगटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली होती.

वांद्रोसोव्हाने चेक प्रजासत्ताकच्या जाना नोव्होत्ना आणि पेत्रा क्वितोव्हानंतर पहिल्यांदाच विंम्बल्डन महिला एकेरीचा खिताब पटकावला आहे. ती ग्रँडस्लॅम टायटल जिंकणारी फक्त 9 वी बिगर मानांकित खेळाडू आहे.

वांद्रोसोव्हाच्या उज्वल कारकिर्दीला दुखापतींचे ग्रहण लागले होते. मात्र आता तिने दुखापतींवर मात करत टेनिस कोर्टवर जोरदार पुरगामन केले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT