Women's IPL Viacom-18
Women's IPL Viacom-18  
क्रीडा

Women's IPL: 951 कोटी! Viacom-18 ने जिंकले महिला IPL चे मीडिया हक्क

Kiran Mahanavar

Women's IPL Viacom-18 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयला महिला इंडियन प्रीमियर लीग (Women's IPL) च्या मीडिया हक्कातून कोठ्यावधी रुपये मिळाले आहेत. या मीडिया राइड्स viacom18 ने जिंकल्या आहेत. खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

रिलायन्सच्या मालकीच्या वायाकॉम-18 ने महिला IPL च्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माहिती देताणा महिला आयपीएलचे माध्यम अधिकार जिंकल्याबद्दल वायकॉम-18 चे अभिनंदन केले. जय शाह म्हणाले की, बीसीसीआय आणि बीसीसीआय महिलांवर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. वायाकॉमने 951 कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे.(viacom 18 wins media rights of womens ipl deal)

जय शाह यांनी निदर्शनास आणून दिले की महिला आयपीएलसाठी मीडिया हक्कांसाठी आजची बोली आणखी एक ऐतिहासिक आदेश आहे. भारतातील महिला क्रिकेटसाठी हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे, जे सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग सुनिश्चित करेल. खरंच एक नवी सुरूवात आहे.

यापूर्वी वायाकॉम-18 ने पुरुषांच्या IPL चे डिजिटल अधिकार देखील विकत घेतले आहेत. वायाकॉम-18 ने 23, 758 कोटी रुपयांना पुरुषांच्या IPL चे डिजिटल हक्क मिळवले. पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया हक्क चार पॅकेजमध्ये विकले गेले. त्यापैकी तीन वायाकॉम-18 ने ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT