women Maharashtra Kesari sakal
क्रीडा

Women Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीतच रंगणार! कुस्तीपटू आजपासून दाखल

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलात मंडप उभारणीचा प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Women Maharashtra Kesari Kusti : पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत होणार की नाही होणार, या चर्चांचा धुरळा आज खाली बसला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलात मंडप उभारणीचा प्रारंभ झाला. दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्तीप्रमाणेच या स्पर्धेत वजनगटांची रचना केली आहे. खुल्या गटात मात्र ६५ ते ७६ किलो दरम्यानच्या महिला मल्लांचा समावेश असेल. महिला कुस्तीपटू उद्या (ता. २२) दाखल होत आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्याकडे आहे. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा होत आहे. कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, "तीनवेळा महाराष्ट्र केसरी व एकवेळ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संयोजनाचा अनुभव आहे. कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सर्जेराव शिंदे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

बेणापूर (ता. खानापूर) व बेडग ता. (मिरज) कुस्ती केंद्रातील ४० बाय ४० आकाराचे दोन मॅट स्पर्धेसाठी मागवले आहेत. क्रीडा संकुलात पश्चिमेकडील गॅलरीत शौकिनांची बसण्याची व्यवस्था आहे. राज्यभरातील ३० मान्यवर पंच नियुक्त केले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एकदम मिळणार ६००० रुपये; ई-केवायसी, दुरुस्ती, संशयित लाभार्थींची पडताळणी सुरू; सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Valentine's Day 2026 Special Recipe: जर तुम्हीही कॅन्डललाइट डिनरचा प्लॅन करत असाल तर 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT