Women one day Cricket Match sakal
क्रीडा

Women Cricket Competition : उत्तराखंडची महाराष्ट्रावर मात; तेजलची शतकी खेळी अपुरी

बडोदा येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत उत्तराखंड संघाने महाराष्ट्राचा आठ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बडोदा येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत उत्तराखंड संघाने महाराष्ट्राचा आठ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. मधल्या फळीत तेजल हसबनीसने (१०५) झळकावलेली शतकी खेळी अपुरी ठरली.

या लढतीत उत्तराखंडने प्रथम फलंदाजी करताना सात बाद २०१ धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा कांचन परिहार (६०) आणि पूनम राऊतने (५१) केलेल्या अर्धशतकाचा होता त्यांना कर्णधार एकता बिश्तने (२५) सुरेख साथ दिली. महाराष्ट्राकडून देविका वैद्य आणि श्रद्धा पोखरकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची एकही फलंदाज आपल्या लौकिकाला न्याय देऊ शकली नाही. एका बाजूने तेजल हसबनीस खेळत असताना तिला साथ देण्यातही अन्य फलंदाज अपयशी ठरल्या. केवळ यामुळेच तेजल हसबनिसची शतकी खेळी व्यर्थ ठरली. महाराष्ट्राचा डाव १९३ धावांवर आटोपला.

सामना संपण्यास एक चेंडू शिल्लक असताना तेजल हसबनीस बाद झाली. तेजल हसबनिसने १४२ चेंडूंत तेरा चौकारांसह आपली शतकी खेळी केली. उत्तराखंडच्या मानसी जोशीने ४० धावांत पाच तर सफिनाने तीन गडी बाद करत तिला सुरेख साथ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghorpadi Crime : विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात कोंडले; शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Sabudana Fruit Custard: थोड्याच साहित्यात बनवा 'साबुदाणा फ्रूट कस्टर्ड'; नवरात्रीच्या उपवासाला मिळेल गोड ट्विस्ट!

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

SCROLL FOR NEXT