क्रीडा

WPL Auction : लिलावानंतर प्रत्येक फ्रेंचायजीचा संपूर्ण संघ एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

Women's Premier League 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात अनेक धक्कादायक बोली लागल्या. भारताची अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू केशवी गौतमला गुजरात टायटन्सने तब्बल 2 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचलं. तर वृंदा दिनेशला यूपी वॉरियर्सने 1.30 कोटी रूपये बोली लावली.

याचबरोबर दिल्ली कॅपटिल्सने एनाबेल सदरलँडला 2 कोटी रूपये देऊन आपल्या संघात घेतलं आहे. गुजरातने फोबे लिचफिल्डवर 1 कोटी बोली लावली. यंदाच्या मिनी लिलावात या चार खेळाडूंवर लागलेली बोली सर्वोच्च ठरली. या लिलावात सर्व फ्रेंचायजींनी आपले 18 खेळाडूंचा संघ पूर्ण केला आहे.

वुमन्स प्रीमियर लीग 2024 च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने 1.2 कोटी रूपये खर्चून शबमन इस्माईलला आपल्या संघात घेतलं. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये इस्माईल हॉबर्ट हरिकेन्सकडून खेळली.

35 वर्षाची शबमन इस्माईल ही दक्षिण अफ्रिकेची वरिष्ठ खेळाडू आहे. ती लिलावातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. ती 2023 मध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळली होती. मात्र तीन सामन्यानंतर यूपीने तिला रिलीज केलं.

यावेळी 165 खेळाडू लिलावात उतरले आहेत. यामध्ये 104 भारतीय आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश होता. पाच संघांची एकूण पर्स 17.65 कोटी रुपये होते. यंदाच्या लिलावात एकूण 30 स्लॉट रिक्त होत्या. त्यापैकी नऊ स्लॉट परदेशी खेळाडूंसाठी होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

Vastu Tips : घरात खूप रखरख वाटते? 'या' 5 बिनकामाच्या वस्तू हिरावू शकतात तुमची शांती; खेचतात नकारात्मकता, कुटुंबात सतत वाद

Abhijieet Dipke यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन सुरु

T20 Squad: हार्दिक-कुलदीप आऊट! टीम इंडियाच्या घोषणेनंतर खळबळ; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण

Chandrapur: नागभीड तालुक्यात ३०.८७ कोटींचे पीककर्ज वितरण; शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा पुढाकार

SCROLL FOR NEXT