थांबायचं नाय गड्या...! अभिजीत दीपकेचा नवा Video, CJP आंदोलनाची सूत्र अजिंक्य शिंदेच्या हाती; कोण आहे तो?

Who Is Ajinkya Shinde? दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. अभिजीत दीपकेसह इतरांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची सुत्रे अजिंक्य शिंदेकडे असणार आहेत.
Who Is Ajinkya Shinde

Who Is Ajinkya Shinde

Esakal

Updated on: 

सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेसह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीत आंदोलनावेळी ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या दीपकेनांच ताब्यात घेतल्यानं आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत होता. पण अभिजीत दीपके यांनी अटकेआधीच व्हिडीओ तयार करून अटक झाल्यास पुढे काय याची माहिती दिली होती. आंदोलनाची पुढील सुत्रे आता अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. आता दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com