T20 Women's World Cup Richa Ghosh esakal
क्रीडा

Women Twenty20 World : सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत भारताची केवळ रिचा घोष

महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत केवळ दोन सामने गमावताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा खेळ भारतीयांनी केला;

सकाळ वृत्तसेवा

केपटाऊन : महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत केवळ दोन सामने गमावताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा खेळ भारतीयांनी केला; परंतु स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या नऊ खेळाडूंमध्ये भारताच्या केवळ रिचा घोषला स्थान मिळाले.

यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या रिषा घोषने ६८ धावांच्या सरासरीने १३६ धावा केल्या. या स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर संपुष्टात आले; तर गटसाखळीत इंग्लंडकडूनही हार झाली होती.

भारतीय संघात फिनिशर म्हणून जबाबदारी पार पाडत असलेल्या रिचाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या लढतींमध्ये ४० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यात इंग्लंडविरुद्ध ४७ धावांची खेळी केली; परंतु भारताला विजय मिळवता आला नव्हता. रिचा पाच सामन्यांत केवळ दोनदाच बाद झाली. तिचा स्ट्राईक रेट १३० पेक्षा अधिक आहे.

सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या इतर खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन, इंग्लंडचे दोन, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. सर्वोत्तम खेळाडूची निवड करताना क्रिकेट चाहत्यांनी वोटिंग करून दिलेल्या मतांचाही सहभाग असणार आहे.

उद्या स्पर्धेचा अंतिम सामना होत असून गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर यजमान दक्षिण आफ्रिका दोन हात करणार आहेत. ऑस्ट्रेलियाकडे मोठा अनुभव आहे, तर दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम सामना खेळणार आहे. या अंतिम सामन्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जाहीर करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT