क्रीडा

IND vs WI Women's WC : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय

सकाळ डिजिटल टीम

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील तिसऱ्या सामन्यात भारताच्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत यांनी तुफान फटकेबाजी करत शतके झळकावली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज महिला वर्ल्ड कपमधील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी दणणीत विजय मिळवला. याआधी भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं तर न्यूझिलंडविरोधात भारताला पराभव पत्करावा लागला होता. वेस्ट इंडिजने त्यांचे आधीचे दोन्ही सामने जिंकले होते. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. यामध्ये भारताने स्मृती मानधना आणि हरमनप्रीत यांच्या शतकांच्या जोरावर ८ बाद ३१७ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजला १६२ धावांनी गुंडाळून वर्ल्ड कपमध्ये मोठ्या विजयाची नोंद केली.

प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारू देण्यात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत यांनी मोठी कामगिरी बजावली. स्मृती मानधनाने ११९ चेंडूत १२३ धावा केल्या. तर हरमनप्रीतने १०७ चेंडूत १०९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत स्नेह रानाने सर्वाधिक ३ तर मेघना सिंहने २ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा डाव ४०.३ षटकात १६२ धावांत आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT