Women's Asian Champions Trophy 2023 Esakal
क्रीडा

Women's Asian Champions Trophy 2023 : चक दे इंडिया! भारतीय महिला संघाने जपानला ४-० ने हरवून जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

भारतीय महिला संघाने जपानला ४-० ने हरवून जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

Kiran Mahanavar

Women's Asian Champions Trophy 2023 : भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.

रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला. या विजयानंतर हॉकी इंडियाने ट्विट करून प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

कोचनी केले खेळाडूंचे कौतुक...!

भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जेनेके शॉपमन यांनी सांगितले की, अंतिम फेरीत आम्हाला ४-० ने विजय मिळण्याची अपेक्षा नव्हती. आम्ही खूप आनंदी आहोत. सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी संघाला खूप प्रोत्साहन दिले. सगळेच उत्साहात होते.

भारताने यापूर्वी 2016 मध्ये सिंगापूरमध्ये पहिले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले होते. तर 2013 आणि 2021 चे विजेते जपान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT