Women's IPL Franchise Base Price esakal
क्रीडा

Womens IPL : कोटीच्या कोटी उड्डाणे! बीसीसीआयने सेट केली फ्रेंचायजींसाठी बेस प्राईस

अनिरुद्ध संकपाळ

Women's IPL Franchise Base Price : पुरूषांप्रमाणे आता महिलांची देखील आयपीएल होणार आहे. बीसीसीआयने पहिल्या वहिल्या महिलांच्या आयपीएलसाठी मार्च 2023 ही विंडो ठेवली आहे. बीसीसीआयने महिला आयपीएलचा पहिला हंगाम जोरदार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय काही दिवसातच पाच संघ विकत घेण्यासाठी इ ऑक्शन आयोजित करणार आहे. यासाठी प्रत्येक फ्रेंचायजीसाठी बेस प्राईस ही 400 कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. इ ऑक्शनसाठी नोटिफिकेशन काही दिवसातच प्रसिद्ध करण्यात येईल. या इ ऑक्शनमध्ये सध्याच्या पुरूष आयपीएलमधील फ्रेंचायजी देखील सहभाग नोंदवू शकतात.

महिला आयपीएलची क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर मुंबईत झालेल्या 18 ऑक्टोबरला बीसीसीआयच्या 91 व्या सर्वसाधारण बैठकीत महिला आयपीएलला मान्यता देण्यात आली. बीसीसीआयने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात 'सर्वसाधारण बैठकीत महिला आयपीएल आयोजित करण्याची परवानगी दिली आहे.' असे सांगण्यात आले.

महिला आयपीएलमध्ये 20 लीग सामने खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ इतर संघाविरूद्ध प्रत्येकी दोनवेळा खेळणार आहे. गुणतालिकेत अव्वल आलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटर सामना खेळेल. प्रत्येक संघात प्लेईंग 11 मध्ये 5 विदेशी खेळाडूंनाच संधी मिळणार आहे.

बीसीसीआयने 'महिला आयपीएलमध्ये देशांतर्गत खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा योग्य समतोल साधण्यासाठी सध्या तरी 5 संघच असणार आहेत. प्रत्येक संघात जास्तीजास्त 18 खेळाडू घेता येतील. यात सहापेक्षा जास्त विदेशी खेळाडू असणार नाहीत.' अशा आशयाचे पत्र आपल्या सल्लग्नित राज्य संघटनांना पाठवले आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT