WPL 2023 Tickets
WPL 2023 Tickets esakal
क्रीडा

WPL Tickets : स्वस्तात पाहा याची देही याची डोळा WPL चा सोहळा! उद्धाटनाला क्रिती अन् कियाराही असणार

अनिरुद्ध संकपाळ

Women's Premier League BCCI Tickets Rates : बीसीसीआयची महत्वकांक्षी लीग वुमन्स प्रीमियर लीग ही येत्या 4 मार्चपासून सुरू होत आहे. पहिलाच सामना हा मुंबई इंडिन्स आणि गुजराज जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र उद्घाटनचा पहिला सामना अवघ्या 72 तासांवर आला असताना देखील बीसीसीआयने सामन्याच्या तिकीट विक्रीबाबत कोणतीच घोषणा केली नव्हती.

अखेर बीसीसीआयने WPL लीगच्या तिकीटांबाबत घोषणा केली असून क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 100 रूपयात महिला प्रीमियर लीगचा आस्वाद याची देही याची डोळा घेता येणार आहे. WPL चे सर्व सामने हे मुंबईत होणार आहेत. याच सर्व सामन्यांच्या तिकीटांचे दर 100 रूपयांपासून सुरू होतात. बीसीसीआयचा WPL साठी ऑनलाईन तिकीट विक्री पार्टनर हा बूक माय शो आहे.

मात्र आयपीएल 2023 चा अनुभव पहायला गेलं तर ही तिकीटे आधीच बूक झालेली असतात. त्यात बीसीसीआयने WPL ची तिकीट विक्रीची घोषणा करण्यास उशीर केला आहे. WPL च्या पहिल्या हंगामाचा पहिला सामना हा 4 मार्चला मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर 4 मार्चला होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजराज जायंट्स यांच्यात होणार आहे.

महिला प्रीमियर लीगमधील सर्व सामने हे मुंबईतील ब्रबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT