WPL 2024 Schedule eSakal
क्रीडा

WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर.. कधी होणार सुरू? जाणून घ्या

गेल्या सीझनला विजेतेपद मिळवलेले मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पहिली लढत असणार आहे.

Sudesh

Women's Premier League 2024 Schedule : यावर्षीच्या महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. गेल्या सीझनला विजेतेपद मिळवलेले मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पहिली लढत असणार आहे. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा पहिला सामना आयोजित करण्यात येईल.

WPL 2024 हे 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 23 तारखेला पहिला सामना असेल, तर 17 मार्च रोजी दिल्लीमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. यावर्षीच्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण 22 सामने होणार आहेत. हे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत.

यावर्षीच्या वुमेन्स प्रीमियर लीगचं फॉरमॅट देखील मागच्या सीझनप्रमाणेच असणार आहे. लीग राउंडमधील टॉप तीन टीम्स प्लेऑफमध्ये जातील. यातील पहिल्या क्रमांकावरील टीम थेट फायनलला जाईल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीममध्ये एलिमिनेटर मॅच खेळवली जाईल. हा सामना 15 मार्चला होणार आहे.

पाहा संपूर्ण वेळापत्रक

  • 23 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 24 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स

  • 25 फेब्रुवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 26 फेब्रुवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 27 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स

  • 28 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स

  • 29 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 1 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स

  • 2 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 3 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 4 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • 5 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 6 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • 7 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 8 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स

  • 9 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

  • 10 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • 11 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स

  • 12 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • 13 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स

  • 15 मार्च - एलिमिनेटर मॅच

  • 17 मार्च - अंतिम सामना.

23 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंतचे सामने बंगळुरूमध्ये होणार आहेत, तर त्यानंतरचे सर्व सामने दिल्लीमध्ये होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT