Women's T20 Challenge Mithali Raj Jhulan Goswami  esakal
क्रीडा

मिताली, झुलनला नाही स्थान; स्मृती, हरमनप्रीत अन् दिप्ती कर्णधार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महिला आयपीएल म्हणून ओळखली जाणारी Women's T20 Challenge स्पर्धा येत्या 23 मे रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा पुण्यात होणार असून त्यात तीन संघांचा समावेश आहे. बीसीसीआयने प्रत्येक संघात 16 खेळाडूंची निवड केली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हाज, स्मृती मानधना (Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्स आणि दिप्ती शर्मा (Deepti Sharma) ही व्हेलॉसिटी या संघाची कर्णधार असरणार आहे. 2020 मध्ये झालेल्या हंगामात ट्रेलब्लेझर्सने जिंकला होता.

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू मिताली राज (Mithali Raj) आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांना कोणत्याही संघात स्थन मिळालेले नाही. याचबरोबर शिखा पांडेचा देखील कोणत्याही संघात समावेश करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत 12 विदेशी खेळाडू देखील भाग घेणार आहेत. यात दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोलवार्ट आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणारी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन यांचा देखील समावेश आहे. तर थायलंडची नथाकेन चेनतम दुसऱ्यांदा या स्पर्धेत भाग घेणार आहे. महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेत एलना किंग ही एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. तर इंग्लंडच्या एक्लेस्टोनबरोबरच सोफिया डंक्ले आणि केट क्रॉ मस देखील टी 20 चॅलेंज स्पर्धेत खेळणार आहेत.

तीन संघ पुढीलप्रमाणे

सुपरनोव्हाज (Supernovas Team) : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, एलेना किंग्ज, आयुष सोनी, चंदू वी, डिएंड्रा डोटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्रकार, प्रिया पुनिया, राशी कनौजिया, सोफी एक्लेस्टोन, सुने लुस आणि मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स (Trailblazers Team) : स्मृती मांधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, तेमिमा रोड्रिग्ज, प्रियांका प्रियदर्शनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, ऋचा घोष, एस मेघना, सैका इशाक, सलमा खातून, शरमीन अख्तर, सोफिया ब्राऊन, सुजाता मलिक आणि एसबी पोखरकर

व्हेलॉसिटी (Velocity Team) : दिप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शेफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, किर्ती जेम्स, लॉरा वोलवार्ट, माया सोनवणे, नथाकेन चेनतम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया आणि प्रणवी चंद्रा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता

U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Loha election result : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का! लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपचे एकाच कुटुंबातील सहा जण पराभूत!

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

Latest Marathi News Live Update: २६ नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

SCROLL FOR NEXT